Latest Marathi News

BREAKING NEWS

२०२४मध्ये चंद्रकांत खैरेच विजयी होतील, त्यांना माझा पाठिंबा; माजी आमदाराची घोषणा

0

विधान परिषद निवडणुकीचे वादळ शांत होत नाही तोच पुण्यातील पोटनिवडणुकीचे वारे वाहू लागले असून भारतीय जनता पक्षाकडून दोन्ही उमेदवारांची नावे दिल्लीतील केंद्रीय नेत्यांकनाडून जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये मात्र आतापासूनच २०२४च्या लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

२०१९मध्ये बंडखोरी केलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. २०२४ मध्ये चंद्रकांत खैरेच निवडून येणार; कारण त्यांना मी पाठिंबा देणार असल्याची घोषणा जाधव यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. या व्हिडिओमुळे आता एकाच चर्चा औरंगनाबादमध्य सुरु झाली असून मागच्या लोकसभा निडणुकीत जाधव त्यांनी इम्तियाज जलील यांना छुपा पाठिंबा दिला होता.

पुढे जाधव म्हणाले की, २०१९च्या विधानसभेला निवडणुकीदरम्यान चुकलो, पण आता नाही चुकणार. कारण मी माझे घरगुती वैयक्तिक मतभेद जेही असतील ते बाजूला ठेवून तालुक्याच्या जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी तटस्थ राहील. स्व. रायभानजी जाधव यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय मी आज घेतो आणि विधानसभेच्या तयारीला लागतो, असेही हर्षवर्धन जाधव म्हणाले आहेत. त्यामुळे पुढील वेळी ते विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.