Latest Marathi News

BREAKING NEWS

सहारा वृध्दाश्रमात १५ लोकांनी केला देहदान, नेत्रदानाचा संकल्प

0

बार्शी |

बार्शी तालुक्यातील गौडगाव येथील सहारा वृध्दाश्रम मध्ये इंनरव्हील क्लब बार्शी च्या अध्यक्षा डॉ. स्वेतल सोमाणी यांच्या संकल्पनेतून नेत्रदान देहदान चळवळीचा एक आदर्श, अभिनव उपक्रम राबविण्यात आला. ज्यामध्ये सर्वप्रथम नेत्ररोग तज्ञ अध्यक्षा डॉ. स्वेतल सोमाणी यांनी नेत्रदानाची तर महाराष्ट्र राज्य आय. एम. ए. चे राज्य सचिव नेत्ररोग तज्ञ डॉ. संतोष कुलकर्णी यांनी देहदानाची माहिती सर्वांना दिली, यातून प्रेरणा घेवून आधी आपण केले मग दुसऱ्यास सांगितले या उक्ती प्रमाणे सहारा वृध्दाश्रम चे संस्थापक राहुल भड यानी स्वतः आपला मरणोत्तर नेत्रदान व देहदानाचा संकल्प करून फॉर्म भरला, त्यानंतर वृद्धाश्रमातील १५ स्त्री – पुरुष सदस्यांनी आपले मरणोत्तर नेत्रदान, देहदान फॉर्म भरून डॉ. स्वेतल सोमाणी मॅडम यांच्याकडे सुपूर्त केले. व आम्ही सध्या बेसहारा आसलो तरी मरणोत्तर कोणाचा तरी सहारा नक्की बनू असा संकल्प करून समाजापुढे आदर्श ठेवला.

कार्यक्रमात सर्वांना मान्यवरांच्या हस्ते दिवाळी फराळ व औषधाचे वाटप करण्यात आले. सहारा वृद्धाश्रमात राबविण्यात आलेल्या नेत्रदान, देहदान चळवळीसाठी अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय च्या शरीर रचना विभाग प्रमुख डॉ. गोसावी मॅडम, महादान संस्था अध्यक्ष व उपसंपादक पुढारी श्री. निवास बागडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. देहदानाचा संकल्प केलेल्या व्यक्तीचा भविष्यातील संकल्प पूर्ण करण्यासाठी सोलापूर येथून गरजेनुसार अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाची मोफत शव वाहिका सेवा देवू असे आश्वासन डॉ. गोसावी मॅडम यांनी दूरध्वनीवरून दिले. इंनरव्हील क्लब व सहारा वृध्दाश्रम करत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मध्ये इनरव्हील क्लब अध्यक्ष डॉ. स्वेतल सोमाणी, सन्माननीय सदस्या सौ. उषा सोमाणी, सौ. अंजली पाठक, महाराष्ट्र राज्य आय. एम. ए. सहसचिव डॉ. संतोष कुलकर्णी, सुप्रसिद्ध फिजीशियन डॉ. योगेश सोमानी, आयुर्वेद व्यासपीठ सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. रोहिणी कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.