Latest Marathi News

BREAKING NEWS

12 तासांत बेस्ट वरच्या जाहिराती काढा नाहीतर…; जितेंद्र आव्हाडांचा शिंदे सरकारला इशारा

0

पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. बेस्ट बसवर लावण्यात आलेल्या जाहीरातींच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. करंट राज्याचे उदो इंडो करणाऱ्या जाहिरातीवर आव्हाड यांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

एकीकडे सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरू आहे. तर दुसरीकडं बेस्ट बसवर ‘चला कर्नाटक नव्याने पाहूया’ अशा प्रकारे जाहिरात करण्यात आली आहे. येत्या 12 तासांत बेस्ट वरच्या जाहिराती काढा नाहीतर मराठी माणूस बेस्ट फोडणार असल्याचा इशारा आव्हाडांनी दिला आहे. ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे.

आज एकीकडे सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर अत्याचाराची मालिका सुरु आहे. आरोग्य सेवा लागू करु देणार नाही, असे कर्नाटकने सांगितलं. त्याच कर्नाटकला छाताडावर बसवण्याचं काम सरकार करत असल्याचं आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. बेस्ट बसवर चला कर्नाटक बघुया अशा प्रकारे जाहिरात करण्यात आली आहे. मराठी माणसाच्या हृदयाला काढलेला चिमटा आहे. त्याचा फोटोही जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केला आहे. बेस्ट वरच्या जाहिराती काढा नाहीतर मराठी माणूस बेस्ट फोडणार. मुंबईची जनता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.