Latest Marathi News

BREAKING NEWS

“१०६ हुतात्म्यांनी मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही, १०६ जण ती जावी म्हणून दिवस-रात्र झटतायत”

0

 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्याचा कारभार चालवायला सुरुवात केली आहे. हे नवे सरकार ज्या पद्धतीने स्थापन झाले आहे, त्यावरून शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी टीकास्त्र सोडले. यातच आता पुन्हा एकदा मुंबई गुजरातला नेण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

एका ट्विटमध्ये संयुक्त महाराष्ट्रावेळी हौतात्म्य पत्करलेल्यांचे स्मरण करत त्याचा संबंध आताच्या राजकारणाशी जोडला आहे. त्यातून मुंबई गुजरातला नेण्यासंदर्भात भाजपवर आरोप केले आहेत. या ट्विटमध्ये अमोल मिटकरी म्हणतात, १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबई गुजरातला जाऊ दिली नाही! १०६ जण आता तीच मुंबई गुजरातला मिळवून देण्यासाठी दिवस-रात्र झटत आहे! असे म्हटले आहे.

या ट्विटला अमोल मिटकरी यांनी, मनाला पटतंय बघा, असे कॅप्शनही दिले आहे. यापूर्वी अमोल मिटकरी यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून खोचक शब्दांत टीका केली होती. यामध्ये, कोरोनानंतरच्या काळात पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलपती म्हणून दीक्षांत समारंभाला आपण स्वतः हजर राहत आहात. विद्यापीठ सदस्य म्हणून आपणास भारतीय संविधानाची प्रत देऊन सन्मानित करताना आनंद होत असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.