Latest Marathi News

BREAKING NEWS

हेमंत रासने यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन ; कसबा पोट निवडणूकीत विजयी करण्याचे केले मतदारांना आवाहन

0

पुणे |

आज पुणे येथे कसबा विधानसभा पोटनिवडणुकितील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंतजी रासने यांचे प्रचारार्थ आज नवीपेठेतील विठ्ठल मंदीरात दर्शन घेवुन विठ्ठल मंदिराचे विश्वस्तांची भेट घेतली. तसेच बाळासाहेब शेरे, सुनिल शिंदे, संतोष ठोंबरे, श्रीकांत पवार आदि मान्यवरांकडे भेटी देवुन हेमंत रासने यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

कसबा पोट निवडणुकीसाठी आज भाजप उमेदवार रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संयुतीच्या नेत्याची एकत्रित सभा होणार आहे, या सभेसाठी भाजपने पंकजा मुंडे उपस्थित राहणार आहेत. येत्या २६ फेब्रुवारी निवडणुकीसाठी मतदान आहे त्या पार्श्वभूमीवर प्रचारात रंगत येतानाचे चित्र दिसत आहे. भाजप व महाविकास आघाडी यामध्येही दुरंगी लढत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

यावेळी प्रचार प्रमुख,नगरसेवक धिरज घाटे,शैलेश लडकत,नगरसेवक बाळासाहेब नवले,संदिप बेलदरे,केदार मानकर,सचिन बांगर आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.