Latest Marathi News

BREAKING NEWS

हुकुमशाही मोदी सरकारसमोर राहुलजी गांधी झुकणार नाहीत, जनतेच्या हितासाठी संघर्ष करतच राहणार – चेतन नरोटे

0

सोलपूर |

मोदी सरकारच्या दबावामुळे राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली या अन्यायपूर्वक कारवाईच्या निषेधार्थ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांचे मार्गदर्शन आणि प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या संकल्पनेतून सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या वतीने राहुलजी गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस भवन येथे “राहुलजी गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है” “सुडाचं राजकारण हा देश सहन करणार नाही” असे पोस्टर (डिझिटल) प्रदर्शित करण्यात आला तसेच जवळपास शंभर रिक्षावर बैनर लावण्यात आले.

यावेळी बोलताना चेतन नरोटे म्हणाले की, मोदी सरकारच्या दबावामुळे राहुलजी गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या अन्यायपूर्वक हुक़ूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात, मोदी सरकारचा भ्रष्टाचार, जनता, कामगार, शेतकरी, व्यापारी, युवक विरोधी धोरणां विरोधात तसेच मोदी-अदानी संबंधांचा लोकांमध्ये जागृती करण्यासाठी सोलापुर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने “राहुलजी गांधी आप संघर्ष करो हम तुम्हारे साथ है, सुडाचं राजकारण हा देश सहन करणार नाही अश्या आशयाचे बैनर संपूर्ण शहरभर पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने लावण्यात येणार आहे. त्यांची सुरुवात आज काँग्रेस भवन येथे बैनर लावून करण्यात आली. तसेच आज जवळपास शंभर रिक्षावर हे वरील आशयाचे बैनर लावण्यात आले. याचा उद्देश्य जनतेत जागृती करणे हेच होय राहुलजी गांधी ज्याप्रकारे भाजपप्रणित मोदी सरकारवर हल्ला करत आहेत, मोदी -अदानी संबंधांचा चीरफाड़ करत आहेत. शेल कंपन्यामार्फ़त अदानीच्या कंपन्यात गुंतवलेला वीस हजार कोटी कुठून आले कोणाचा पैसे आहेत याचा जाब जाहिरपने विचारत आहेत म्हणून मोदी सरकार घाबरले आहे. त्यामुळे देशभरात राहुल गांधी यांच्याविरोधात खोटे प्रचार करत आहेत. जनतेच्या प्रश्नावर कधीही रस्त्यावर न आलेल्या भाजप नेत्यांना राहुलजी गांधी रस्त्यावर आणले. राहुलजी गांधी त्याग बलिदान दिलेल्या गांधी कुटुंबाचे वंशज आहेत. त्यांच्या रक्तातच संघर्ष आहे. राहुलजी गांधी मोदींच्या हुकुमशाही विरोधात लढत आहे काँग्रेसने ब्रिटिशाना घालवले भाजपला ही घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, मा. नगरसेवक हाजी तौफीक हत्तूरे, विनोद भोसले, आरिफ शेख, दत्तू बंदपट्टे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, अँड मनीष गडदे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, ब्लॉक् अध्यक्ष देवीदास गायकवाड़, लक्ष्मीकांत साका, बाबुराव म्हेत्रे, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, अनिल मस्के, तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, जेम्स जंगम, जितु वाडेकर, प्रवीण जाधव, दीनानाथ शेळके, शकील मौलवी, रूपेश गायकवाड, शकील शेख, संजय गायकवाड, समीर काझी, भोजराज पवार, महेंद्र शिंदे, शाहु सलगर, गंगाधर गुमटे, नूर अहमद नालवार, शरद गुमटे, करीमनुस्सा बागवान, चंद्रकांत टिक्के, सुदर्शन अवताड़े, मुमताज तांबोली, अनिल वाघमारे, सुभाष वाघमारे, VD गायकवाड, चंदू नाईक, लखन गायकवाड, वसिष्ठ सोनकांबले, आदित्य म्हमाने, श्रीकांत दासरी, मुमताज शेख, सुनीता बेरा, मनोहर चकोलेकर, रेखा बिनेकर, श्रीशैल रणदिवे, रशीद शेख, राजू राठोड, श्रीशैल रनखांबे यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.