Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूर : चिखल आणि डबकी; ‘स्मार्ट’ नव्हे ‘विद्रूप’ सिटी

0

सोलापूर : शहरात ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत रस्यांची कामेही करण्यात आली. मात्र सध्या रस्यांवरील खनुयात ठिकठिकाणी पाणी साचून डबकी निर्माण झाली आहेत. शहराच्या विस्तारित भागांत पक्के रस्ते नसलेल्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे ‘स्मार्ट सिटी अंतर्गत हजारो कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत. परंतु जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, अशोक चौक, कुंभार वेस, एस.टी. सँड आदी ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. हे खड्डे महापालिकेने पावसाळा सुरू होण्यापूर्वी बुजविणे गरजेचे होते. परिणामी ठिकठिकाणच्या खयांत पाणी साचून राहिले आहे. पाण्यामुळे खायांचा अंदाज येत नसल्याने वाहनधारकांची मात्र मोठी कसरत होत आहे. गाडी अचानक आदळून हाडे खिळखिळी झाल्याचा अनुभव येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तर तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, दक्षिण तहसीलदार कार्यालयाजवळ पडलेला मोठा खड्डा वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरत आहे. एकीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील अनेक रस्यांची कामे केली जातात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यांवरच खड्डे पडल्याने आणि त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या खञ्जयांत ड्रेनेजचे पाणी आणि पावसाचे पाणी जमा झाल्यानंतर नागरिकांना जाताच येत नाही. पोलिस पेट्रोल पंपासमोर गुडघाभर खड्डा शहरातील अशोक चौक या भागातील पोलिस पेट्रोल पंपासमोर रस्यावर गुडघाभर खड्डा पडला आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळे साचले आहे. याचा वाहनधारकांना त्रास होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.