Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूरात तेलगु सिनेचित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेते डॉ. एन. टी. रामाराव यांच्या जन्मशताब्दी आयोजन

0

सोलापुर |

तेलुगु सिनेमा चित्रपट सृष्टितील प्रसिद्ध अभिनेता, तेलगू देशम पार्टीचे संस्थापक व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांच्या जन्मशताब्दी व सोलापूर एन. टी. आर. फैन्स असोसिएशन ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापुरात मार्च 2023 अखेरपर्यंत डॉ. एन. टी.रामाराव यांचा जन्मशताब्दी निमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय व आंध्र प्रदेश, तेलंगणातील प्रमुख नेते, अभिनेते व उद्योजक या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात सोलापुरातील तेलगू भाषिक माजी खासदार, माजी आमदार, माजी महापौर, उद्योजक, पत्रकार, स्थानिक कलाकारांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या जन्मशताब्दी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी उपस्थित रहावे म्हणून आज रोजी नटरत्न पद्मश्री डॉ. एन. टी. रामाराव शैक्षणिक, सांस्कृतिक क्रीड़ा मंडळाचे अध्यक्ष तिपन्ना गणेरी, मल्लिकार्जुन कमटम, बालराज बोल्ली, रामुलु पोतू, हनमंतु सायबोलू, तिपन्ना चिनराज, श्रीनिवास गोसकी, श्रीनिवास गणेरी, अंबादास भंडारी, भीमनाथ प्रभाकर यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आग्रहाची मागणी केली.

यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्वाना तीळ गुळ देऊन स्वागत केले. यावेळी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे आणि कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.