सोलापूर |
सोलापूरकरांना आता दिल्ली गाठण्यासाठी केवळ केके अर्थात कर्नाटक एक्स्प्रेसवर अवलंबून असणार नाहीत. कारण, हुबळी- हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसला मंगळवार संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाणमंत्री प्रल्हाद जोशी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे हिरवा झेंडा दाखविला असून, ही गाडी सोलापूरमार्गे धावणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांसाठी नवी दिल्लीला जाण्यासाठी आणखी एक गाडी उपलब्ध झाल्याने सोलापूरकरांची सोय झाली आहे.
विशेष म्हणजे, ही गाडी हुबळी येथून २०६५७ या क्रमांकाने शुक्रवारी (ता. १४) रात्री ११.५० वाजता निघेल व हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी (१६) सकाळी १०.४० वाजता पोचेल. तसेच हजरत निजमुद्दीन स्थानकावरून २०६५८ या क्रमांकाने रविवारी (ता. १६) दुपारी ३.५५ वाजता सुटेल. या रेल्वेगाडीला एकूण २२ एलएचबी डबे असणार आहेत. त्यामुळे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे.ही गाडी हुबळी येथून शुक्रवारी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. गदग रात्री एक वाजता, बदामी रात्री २.१२, बागलकोट रात्री २.५३, विजयपूर पहाटे ५.२५ तर सोलापूरला सकाळी ८ वाजून ३५ मिनिटांनी पोचेल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ८ वाजून ४० मिनिटांनी कुर्डुवाडीकडे रवाना होईल. कुर्डुवाडी सकाळी ९.४०, दौंड ११.१०, दुपारी १२.३५, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), बिना, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन (झांशी), ग्वाल्हेर, आग्रा आदी तर निजामुद्दीन येथून रविवारी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी गाडी निघेल. आग्रा, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई जंक्शन (झांशी), बिना, राणी कमलापती (भोपाळ), इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव सकाळी १०.१८, अहमदनगर दुपारी १२.१०, दौंड ४.२५, कुर्डुवाडी ५.५३ तर सोलापूरला सायंकाळी सात वाजता येईल. ७ वाजून ५ मिनिटांनी हुबळीकडे रवाना होईल. विजयपूरला रात्री ९.४० वाजता, बागलकोट १०.४३, बदामी १२.०९, गदग २.२० आणि मंगळवारी पहाटे ४ वाजता हुबळी स्थानकावर पोचेल.
सोलापूरहून दिल्लीकरिता पूर्वी फक्त एक्स्प्रेसचाच पर्याय होता, ज्यामधे बार ने वेटिंग लागत असे. पण नवीन रेल्वे गाडीमुळे दिल्लीला जाण्याकरिता उत्तम पर्याय उपलब्ध झाला.