मुंबई |
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य शासन संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. असे प्रतिपादन चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आज १ डिसेंबर रोजी कर्नाटकचे माजी आमदार डॉ. एम. जी. मुळे आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाषकांच्या शिष्टमंडळाने सीमाभागातील मराठी बांधवांच्या अडी-अडचणींबाबत चंद्रकांत दादाची भेट घेतली. महाराष्ट्रातील युती सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही देत त्यांना आश्वस्त केलं.

सीमा भागातील बांधवांना महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ प्रभावीपणे मिळावा, सीमाप्रश्न हा विषय हाताळणाऱ्या विशेष कक्षाचे बळकटीकरण करावे या सह अन्य प्रश्नासाठी चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेतली. सीमाभागातील प्रश्नासाठी शिंदे-फडणवीस सरकारने नुकतीच यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने प्रयत्न करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती मंत्र्याची नियुक्ती केली होती.