Latest Marathi News

BREAKING NEWS

‘सांघिक किल्ले बनवा’ स्पर्धेतील विजेत्यांची शिवनेरी सहल

0

पुणे |

कोथरुडमधील बालमित्रांसाठी आयोजित केलेल्या ‘सांघिक किल्ले बनवा’ स्पर्धेतील विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एका किल्याची सहल घडवून आणण्याची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घोषणा केली होती. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी शिवरायांचे जन्मस्थान ‘किल्ले शिवनेरी’साठी ही सहल निघाली‌.

चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूड मतदारसंघातून विधानसभेचे आमदार आहेत, मतदारसंघातील नागरिकांसाठी ते विविध कार्यक्रम राबवत असतात. दिवाळीनिमित्त सांघिक किल्ले बनवा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यानिमित्त चंद्रकांत दादांनी किल्ले शिवनेरीवर सहल काढण्याचा शब्द दिला होता, चिमुकल्यासाठी सहलीला जाताना वेगळा आनंद दिसत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.