Latest Marathi News

BREAKING NEWS

सहकार भारतीच्या तालुका अध्यक्षपदी अमित इंगोले

0

बार्शी-12 सहकार भारती शाखेचा तालुका समिती पदग्रहण समारंभ थाटात संपन्न झाला. येथील मातृमंदिर येथील सभागृहात पंढरपूर येथील संत विषयाचे गाढे अभ्यासक डॉ. सचिन लादे व ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र तथा ज्येष्ठ राजकीय संपादक राजा माने यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.आपले विचार व्यक्त करीत असताना डाॅ.सचिन लादे यांनी सहकाराचे महत्त्व व सप्तसुत्री समजावून सांगितली. सहकार भारतीमुळे सहकार क्षेत्राला ऊर्जेत अवस्था प्राप्त झाली असे त्यांनी सांगितले आज देशभरात सुमारे साडेआठ लाख सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरलेले आहे शहरासोबतच ग्रामीण भागातील मोठा वर्ग हा या सहकारी संस्थांमधून आपला उदरनिर्वाह करतो, ग्रामीण भागाची जीवनदायिनी म्हणून सहकाराकडे पाहिले जाते भ्रष्टाचाराने बरबटलेल्या सहकाराचे भवितव्य अंधकारमय आहे त्यामुळेच सहकार राजकारण विरहित आणि स्वच्छ पारदर्शी असायला हवा.राजा माने यांनी आपल्या मनोगतामध्ये पद्मश्री विखे पाटील यांनी सुरू केलेला सहकारी तत्त्वावरील पहिला सहकारी ऊस कारखाना, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यासह अनेकांनी सहकार क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय कार्य केले, त्याचा उहापोह केला.सहकार भारती ही अखिल भारतीय स्तरावर सहकारी क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संघटना आहे. ‘विना सहकार, नही उद्धार’ हे सहकाराचे ब्रीदवाक्य आहे, तर सहकार भारतीने ‘विना संस्कार, नही सहकार’ अशी जोड दिलेली आहे. देशातील सर्व जिल्ह्यात सहकार भारतीचे काम चालू आहे. बार्शी तालुक्यातही संघटित सहकाराचे आधारावर आर्थिक परिवर्तनाची कल्पना घेऊन कार्यकर्ते काम करीत आहेत. अशा कार्यकर्त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी व सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी विविध जबाबदारी स्वीकारावी म्हणूनच नवनियुक्त तालुका समितीचा पदग्रहण समारंभ आयोजित केला गेला होता.सहकार भारती बार्शी शाखेचे नूतन अध्यक्ष म्हणून बार्शीतील प्रसिद्ध अभियंता अमित इंगोले, सचिव म्हणून शिवशक्ती बँकेच्या शहर शाखेचे शाखाधिकारी विजय शिखरे यांनी पदभार स्वीकारत त्यांनी यापुढील काळात सहकार अधिक समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध राहुत असा विश्वास व्यक्त केला. बार्शी तालुका समितीमध्ये पुढील प्रमाणे सदस्य आहेत मिलिंद कांबळे, प्रकाश फुरडे, अजिंक्य बुडूख, स्वप्निल सावळगी, सौ कुसुम देवकर, विनोद पवार मंगेश बारंगुळे, समाधान पाटील, अतुल सोनीग्रा, विनोद बुडूख, रामचंद्र गौरकर, सुशम बंडेवार, भरत परमार, सागर जहागीरदार, गणेश शिंदे, दत्तप्रसाद पाटील, डॉ.सुबोध केसकर, सूर्यकांत वायकर यांचा समावेश आहे.सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बार्शीचे चालक आनंद सोमाणी, सहकार भारतीचे सोलापूर जिल्हा महामंत्री शिवानंद बोरामणी, जिल्हा कार्यकारणी सदस्य मुरलीधर चव्हाण, बार्शी शहर पालक नंदकुमार होनराव, कविवर्य रामचंद्र इकारे, अनिल खजानदार, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल खजानदार यांनी केले, तर आभार मुरलीधर चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.डॉ.वंदना यादव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय चव्हाण, निर्भय चव्हाण, ओंकार हिंगमिरे,उर्मिला वखारीया, इत्यादींनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.