Latest Marathi News

BREAKING NEWS

सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना- मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे |

पुण्यातील 18 पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल; त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

लहान मुलांच्या आयुष्यात सकारात्मकता यावी, त्यांनी गैरवर्तन करू नये, बालकांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यासोबत त्यांचं समुपदेशन आणि मानसशास्त्रीय आधार किंवा वैद्यकीय उपचार देणं आदींसाठी पुण्यात बालस्नेही कक्ष तसंच महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यांपैकी स्वारगेट पोलीस ठाण्यातील बालस्नेही कक्ष आणि महिला व बाल पथक कक्षाचं उद्घाटन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलं. या वेळी लहान मुलांना खेळण्यासाठी काही खेळणी भेट दिली.

यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेशकुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.