Latest Marathi News

BREAKING NEWS

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

नाशिक |

तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी झाली आहे. शेतकऱ्याला तर अक्षरशः जीव देण्याची वेळ येत आहे. कारण एक तर शेतकरी वर्गाला पिकांचा योग्य भाव मिळत नाही आणि तर दुसरीकडे शेतकरी वर्गावर निसर्ग राजा सुद्धा कोपला आहे. त्यामुळे शेतकऱ्याची सुद्धा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने अहवाल शासनाला सादर करावा अशा सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावामध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून मंत्रीमंडळात मदतीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येइल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवून यावेळी शेतकऱ्यांना धीर दिला.

बागलाण तालुक्यातील मोसम व करंजाडी खोऱ्यातील करंजाड, भुयाने, निताणे, आखतवाडे, बिजोटे, गोराणे, आनंदपूर, द्याने, उतराने, तर सटाणा, शेमळी, अजमीर सौंदाणे, चौगाव, कर्हे,ब्राह्मणगाव, लखमापुर, आराई, धांद्री आदी गावांत शनिवारी दि. 8 एप्रिल,2023 रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने उन्हाळी कांदा, गहू, हरभरा, आंबा, भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिजोटे, आखतवाडे, निताणे आदी गावांतील नुकसानीची पाहणी केली. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, जिल्हाधिकारी गंगाथरन् डी., मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, बागलाण प्रांत बबन काकडे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, गट विकास अधिकारी पी.एस.कोल्हे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, नितानेचे सरपंच अशोक देवरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे पंचनामे करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी, असे सांगितले. तसेच यावेळी त्यांनी निताणे, आखतवाडे, बिजोटे येथील कांदा, डांळीब, पपई व इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.