Latest Marathi News

BREAKING NEWS

सतत फोन करून विवाहितेचा संसार मोडला; त्यानंतर तरुणानी केलं धक्कादायक कृत्य

0

बीड |

महिलावरील अत्याचाराच्या घटना अत्यंत संतापजनक आहे, अशाच प्रकारची धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. तरुणानं अगोदर सतत फोन करून वीस वर्षीय विवाहितेचा संसार मोडला. त्यानंतर घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पीडितेवर अत्याचार घटनेबाबत अधिक माहिती अशी की, हा तरुण सतत फोन करून या विवाहितेला त्रास द्यायचा. या तरुणामुळे तिचा संसार मोडला. त्यानंतर तिच्या पतीनं तिला माहेरी आणून सोडलं. संबंधीत पीडित तरुणी तिच्या माहेरी राहत होती. तिच्या माहेरच्या घरी घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपीनं या विवाहितेचं तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल दरम्यान या प्रकरणी पीडित तरुणीच्या वतीनं बीडच्या शिरूर कासार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.