संपूर्ण जगामध्ये कार्यरत असलेल्या व्ही. ग्रुप या शिप मॅनेजमेंट व शिप सर्विसेस कंपनीने मुंबई येथे आयोजित केलेल्या.
संपूर्ण जगामध्ये कार्यरत असलेल्या व्ही. ग्रुप या शिप मॅनेजमेंट व शिप सर्विसेस कंपनीने मुंबई येथे आयोजित केलेल्या.
संपूर्ण जगामध्ये कार्यरत असलेल्या व्ही. ग्रुप या शिप मॅनेजमेंट व शिप सर्विसेस कंपनीने मुंबई येथे आयोजित केलेल्या. व्ही शिप ऑफिसर्स कॉन्फरन्स या कॉन्फरन्सला सहभागी होण्याचा व तिथे आपले म्हणे माडण्याचा मान वरवडे गावचे सुपुत्र विश्वनाथ गायकवाड यांना मिळाला. कंपनीची गुणवत्ता वाढवणे व कंपनीमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कंपनीच्या प्रती अस्था वाढवण्यासाठी आवश्यक बाबी या विषयावरती त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वतःचा परिचय करून देत असताना त्यांनी तयार केलेल्या मानवता हाच खरा समुद्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धर्म यातील चित्राची माहिती दिली. व एक हात शेतकऱ्याच्या लेकीसाठी हे ब्रीद घेऊन काम करत असलेल्या ग्रामीण विद्यार्थिनी सायकल बँकेची माहिती दिली .तसेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोग व भ्रष्टाचार निवारण भारत मार्फत केल्या जाणाऱ्या कामाची ही माहिती त्यांनी दिली.
ते गेली तीन वर्ष व्ही ग्रुप या जागतिक पातळीवरती काम करणाऱ्या कंपनीबरोबर काम करत आहेत . व्ही ग्रुप हि कंपनी जगातील तीस देशांमधून काम करते. तीस देशांमध्ये त्यांची साठ कार्यालये आहेत.
या क्षेत्रातला कंपनीचा 35 वर्षाचा अनुभव आहे . समुद्रामध्ये जहाजावर काम करणारे 2750 मर्चंट नेव्ही ऑफिसर कंपनीकडे आहेत. ज्यांच्यामुळे कंपनीला चवे चाळीस हजार लोकांना जमिनीवरती काम देणे शक्य झाले आहे. सेवा व गुणवत्ता या बाबी मध्ये व्ही ग्रुप चे नाव संपूर्ण जगात गाजलेले आहे. या कार्यक्रमासाठी परदेशी अधिकारीही आले होते .यामध्ये ख्रिस्तीयन बर्नहॉप ऑपरेशन डायरेक्टर व बिजुम स्प्रोटे सीईओ यांचा समावेश होता.
पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे अशी आणखीन एक बाब म्हणजे जागतिक पातळीवरती विविध 30 देशातून काम करणाऱ्या या कंपनीचे कामकाज दोन मराठी अधिकारी सांभाळत आहेत यामध्ये प्रदीप काळे हे व्ही. शिप चेन्नई चे एम.डी .आहेत तर व्यंकटेश गोमतम हे रीजनल क्रू ऑपरेशन डायरेक्टर आहेत.