Latest Marathi News

BREAKING NEWS

संपर्काची रेंज चांगली असेल तर माणसाचं नेटवर्क कधी तुटत नाही – आमदार सतेज पाटील

0

कोल्हापूर |

काँग्रेसतर्फे २६ जानेवारी पासून हाथ से हाथ जोडो अभियान सुरु होत आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी साडेतीन हजार किलोमीटरचा प्रवास करून ऊन, वारा, पाऊस कशाची तमा न बाळगता कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत लोकांना एक केलं. या यात्रेत समाजातील प्रत्येक घटकाने स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, हेच या यात्रेचं मोठं यश आहे. आता हाथ से हाथ जोडो अभियान समाजातील प्रत्येक घटकापर्यंत, प्रत्येक दारापर्यंत आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणे आपली जबाबदारी आहे असे मत आमदार सतीश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

2014ची निवडणूक फेसबुकवर, 2019 ची व्हॉट्सअप वर झाली. आता 2024 ची निवडणूक युट्युबवर होणार आहे. त्यामुळे या बदललेल्या संकल्पनेनुसार पारंपारिक गोष्टी सोडून नव्या पद्धतीने प्रचाराला सज्ज व्हा अशा शब्दात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. हाथ से हाथ जोडो अभियान समन्वयक अभय छाजेड, बाळासाहेब देशमुख,आमदार पी.एन.पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, शशांक बावचकर, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्ष सुप्रिया साळोखे, युवक काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव तहसीलदार, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उदय पोवार, सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.