ऐन दिवाळीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून पीएम किसान योजनेचा १५ वा हप्ता दिवाळीत भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शेतकरी बांधव अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर अर्ज करू शकतात. शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर त्यांचे भूलेख क्रमांक, बँक खात्यांचे आधार सिडिंग आणि ई केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास त्यांचा हप्ता बंद होऊ शकतो. पी एम किसान योजनेशी संबंधित काही अडचण असल्यास शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. किंवा शेतकरी हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 किंवा 011-23381092 वर देखील संपर्क करू शकतात.
महाराष्ट्रातील ८४ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असून जमिनीच्या नोंदी योग्य पद्धतीने न केल्यास लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे. या योजनेतून यापूर्वी केंद्र शासनाच्या पीएम किसान मधून वार्षिक ६ हजार रुपये जमा होत होते.(दर चार महिन्याला रु. २०००/- प्रमाणे) त्यात आता महाराष्ट्र शासनाकडून नमो किसान योजनेअंतर्गत ६ हजार रुपये जमा होणार असून आता ही रक्कम वार्षिक १२ हजार रुपये अशी होणार आहे.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट