बार्शी |
बार्शी शहरातील शिवशक्ती बँकेमध्ये नोकरी करणारे बालाजी श्रीमंत कोल्हे व त्यांच्या पत्नी भाग्यश्री कोल्हे या दांपत्याच्या हस्ते आज ३ एप्रिल रोजी अन्नपूर्णा योजनेचे पूजन करण्यात आले. बालाजी कोल्हे यांचे मूळ गाव कळंब तालुक्यातील वाकडी हे असून नोकरीनिमित्त ते बार्शीमध्ये असतात. कोल्हे दाम्पत्याला तीन मुली असून त्या शिक्षण घेत आहेत. बालाजी कोल्हे यांचा विविध सामाजिक उपक्रमात ही सक्रिय सहभाग असतो.
मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना ही गेल्या अनेक वर्षापासून बार्शी शहरांमध्ये राबवली जाते. प्रतिदिन २०० पेक्षा अधिक गरजूंना रोज दोन वेळचे अन्न नि:शुल्क दिले जाते. समाजातील विविध दानशूर यांच्या मदतीने मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही आगळीवेगळी चळवळ चालवली जाते. बार्शी शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील ही सेवा नाममात्र दरात दिली जाते. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरासह तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. आज अन्नपूर्णा योजनेचे पूजन व वितरण बालाजी श्रीमंत कोल्हे व त्यांच्या पत्नी भाग्यश्री कोल्हे या दांपत्याच्या हस्ते करण्यात आले.