Latest Marathi News

BREAKING NEWS

शाहू महाराजांनी पुरोगामी कोल्हापूरचा वारसा खंबीरपणे जोपासला – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

0

कोल्हापूर |

श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी पुरोगामी कोल्हापूरचा वारसा खंबीरपणे जोपासत वेळोवेळी कणखर भूमिका घेतली आहे. भविष्यातही ते कोल्हापुरी बाणा आणि परंपरा जपत तरुणांना एका समतेच्या विचाराने एकत्र ठेवण्याचं काम सातत्याने करत राहतील, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे.

करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात कोल्हापूर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित भव्य निकाली कुस्ती स्पर्धा रंगली. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या स्पर्धेला माजी राज्यपाल डी.वाय. पाटील यांच्यासह उपस्थित होतो.

या स्पर्धेला पालकमंत्री दिपक केसरकर, गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, संभाजीराजे छत्रपती व मालोजीराजे छत्रपती, प्रकाश अबीटकर, तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, समरजीत घाडगे, अॅड. महादेवराव आडगुळे प्रतापसिंह जाधव, संग्रामसिंह भोसले आदी मान्यवर आणि कुस्ती प्रेमी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.