Latest Marathi News

BREAKING NEWS

शासकीय योजनासाठी आधार जोडणी महत्वाचे – नायब तहसीलदार संजीवन मुंडे

0

बार्शी |

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर संचलित शिक्षण शास्त्र महाविद्यालय बार्शी राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत राबवले जात आहे या शिबिराचा मुख्य उद्देश युवकांचा ध्यास ग्रामसेवक असा आहे हे शिबिर मौजे उपळाई ठोंगे तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर येथील जिल्हा परिषद शाळा व किसान कामगार विद्यालय येथे आयोजित केला आहे.

आज दिनांक ४ जानेवारी २०२३ रोजी नवीन मतदार नोंदणी आणि आधार कार्ड जोडणे उद्बोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून निवासी नायब तहसीलदार माननीय श्री संजीवन मुंडे बार्शी व उदय कोंढारे हे होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस स्वयंसेविका नरुटे मोनिका यांनी केले यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले व पाहुण्यांचा परिचय स्वयंसेविका पाटील अपर्णा यांनी केला.

यानंतर नवीन मतदार नोंदणी आणि आधार कार्ड जोडणी या विषयावर संजीवन मुंडे यांनी मार्गदर्शन केले त्यामध्ये त्यांनी शासकीय योजनांसाठी आधार कार्ड जोडणी करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले तसेच ऑनलाइन ओळखपत्र आधार सोबत लिंक करण्याची माहिती दिली.कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. एम. एस .डिसले यांनी शिबिरातील वेगवेगळ्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.

यानंतर कार्यक्रमाचे आभार स्वयंसेविका पाटील मंजुषा यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका कुमारी देवयानी शेळके यांनी केले यावेळी उदय कोंढरे सर, सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका शाळा क्रमांक एक व दोन मधील विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. अशाप्रकारे मतदार नोंदणी आणि आधार कार्ड जोडणे उद्बोधन हा कार्यक्रम पार पडला

Leave A Reply

Your email address will not be published.