“शाईफेकीची घटना अत्यंत दुर्दैवी ; चंद्रकांत दादाच्या बोलण्याचा आशय लक्षात घ्यावा..!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई |
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर झालेली शाईफेकीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. असे कृत्य करणाऱ्या लोकांनी त्यांच्या बोलण्याचा आशय लक्षात घ्यायला हवा होता. त्या शब्दाबद्दल त्यांनी खुलासा केला, माफी सुद्धा मागितली, तरीही अशा पद्धतीने टार्गेट करणे अयोग्य आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
आजच्या काळात सरकारी अनुदानाच्या मागे लागतात. मात्र त्याकाळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारख्या महनियांनी समाजातून लोकवर्गणी गोळा करून शिक्षणाच्या व्यवस्था निर्माण केल्या, हेच चंद्रकांतदादा पाटील यांना सांगायचे होते.