Latest Marathi News

BREAKING NEWS

” विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे निरमा आंदोलन…!”

0

मुंबई |

आज शुक्रवार, दिनांक २४ मार्च रोजी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राज्य सरकारच्या विरोधात निरमा आंदोलन करण्यात आले आहे. नेत्यांच्या फोटोला निरम्याने आंघोळ घालत घोषणाबाजी देण्यात आली. राज्यातील अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना अजूनही न मिळालेली मदत, पंचनामे, गुढीपाडवा उलटून गेला तरी आनंदाचा शिधा अजूनही राज्यातील अनेक ठिकाणी न मिळाल्यामुळे विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.

गुजरात निरमा पावडर, केंद्रीय यंत्रणा तसेच राज्य सरकारच्या कारभाराविरोधात विरोधकांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. विधीमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पन्नास खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी देखील विरोधकांनी यावेळी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.