Latest Marathi News

BREAKING NEWS

विधिमंडळाच्या अधिवेशनात १२ विधेयकं मंजूर… चंद्रकांत पाटील यांनी सभापती, उपसभापती, मंत्रीगण आणि सर्वपक्षीय आमदारांचे मानले आभार

0

नागपूर |

नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात १२ विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. राज्याच्या हिताचे अनेक निर्णयही घेण्यात आले आहेत. संसदीय कार्यमंत्री या नात्यानं चंद्रकांत पाटील यांनी सभापती, उपसभापती, मंत्रीगण आणि सर्वपक्षीय आमदारांचे आभार मानले.

कोरोना संकट कालावधीनंतर नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात 12 विधेयके मंजूर करण्यात आली. त्याचबरोबर धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस थेट त्यांच्या खात्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय इतर विविध निर्णयांच्या माध्यमातून विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्य सरकारने राज्याच्या हिताचे निर्णय घेतल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर पत्रकार परिषदेत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार व पणन मंत्री अतुल सावे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.