मुंबई |
विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्ती प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आता ४ जुलैला होणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेतील १२ आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे दिली होती.
मात्र, कोश्यारी यांनी त्यावर निर्णय घेतला नाही. त्याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुनील मोदी यांनी याचिका दाखल करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीचा दिलेला पहिला प्रस्ताव ग्राह्य धरावा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. या प्रकरणी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली असून आता ५ जुलैला सुनावणी होणार आहे.