Latest Marathi News

BREAKING NEWS

वयाचा ऐंशीचा पल्ला, सुशीलकुमारजींची ऊर्जा मात्र तरुणाईला हेवा वाटावा अशीच!

वयाचा ऐंशीचा पल्ला, सुशीलकुमारजींची ऊर्जा मात्र तरुणाईला हेवा वाटावा अशीच!

0

राजकारणात कितीही चढ-उतार राहिले तरी देशाच्या राजकारणाच्या इतिहासात ज्यांचे नाव ठळकपणे नोंदले गेले आहे, त्या नामावलीतील एक ख्यातनाम नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे! राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मानाची पदे भूषविलेल्या या व्यक्तिमत्वाचे पाय आपले जमिनीत घट्ट रोवलेले पाय आजही विचलित झालेले नाहीत.वयाचा ऐंशी वर्षांचा पल्ला गाठला तरीही त्यांचा लोकांमध्ये मिसळून काम करण्याचा उत्साह आणि ऊर्जा तरुणाईलाही हेवा वाटावी अशीच आहे! माझ्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं…” या पुस्तकात त्यांचा अंतर्भाव आहे. ते पुस्तक आणि पुस्तकातील ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या रेखाचित्राची फ्रेम त्यांना भेट देण्यासाठी सोलापुरात त्यांच्या निवासस्थानी मी व माझी पत्नी सौ.मंदाने त्यांची भेट घेतली. युवा नेते चेतन नरोटे आणि काही पत्रकार मित्रही होते. सुशीलकुमारजींनी पुस्तकाचे कौतुक तर केलेच पण पुस्तकावर माझी स्वाक्षरी करण्याची आठवणही आवर्जून केली. आषाढी एकादशीचा दिवस होता.त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत उपवासाची खिचडीही खाल्ली! सोबत गप्पा चांगल्याच रंगल्या.मी व माझ्या पत्नीने त्यांना पुस्तक व त्यांच्या रेखाचित्राची फ्रेम भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.