बार्शी-20. स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त लायन्स क्लब बार्शी रॉयल ,बार्शी नगरपरिषद बार्शी सुरक्षा व देशयांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा ऑटोटेक इंडिया इलेक्ट्रिक बाइक कंपनी पुरस्कृत
रक्षा सुरक्षा और देश के प्रति आकांक्षा हा गौरव सोहळा व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रमाचे मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत, तहसीलदार सुनील शेरखाने नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या गौरव सोहळात ला. सुनील पाटील यांनी स्वागत केले ,कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स क्लब बार्शी रॉयल अध्यक्ष ला.हेमल दोशी (माढेकर) यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल ला.एम के पाटील, माजी प्रांतपाल ला.जितेंद्र दोशी, डी. वाय. एस. पी. जालिंदर नालकुल, तिरंगा ऑटोटेक चे सोलापूर जिल्ह्याचे वितरक महेश गांधी, बार्शी नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी शब्बीरभाई वस्ताद, रिजन चेअरमन ला.बापू कदम, झोन चेअरमन ला.गणेश भंडारी उपस्थित होते.यांच्या हस्ते बार्शी व बार्शी परिसरातील विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी निस्वार्थ सेवा दिलेली आहे, अशा सेवा यात्रींचा गौरव सोहळा सन्मानपत्र, ट्रॉफी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्यासोबत देशभक्तीपर गीत ही लाईव्ह आर्केस्ट्रा यशवंतराव चव्हाण सभागृह बार्शी येथे पार पडला.
या सोहळ्यामध्ये पर्यावरण रक्षा, महिला सुरक्षा , गो रक्षा करणाऱे प्राणी मित्र,गरजू अनाथ मुलांना सांभाळणाऱे संस्थाचालक, सहारा वृद्धाश्रम चालवणाऱे संस्था चालक ,पोलीस अधिकाऱी, कोविड काळामध्ये आरोग्य रक्षणासाठी ज्यांनी योगदान दिले अशा परिचारिका, तसेच भारत सरकार यांच्या उपक्रमांतर्गत एन एच यु एम सेंटरच्या माध्यमातून सेवा करत असलेल्या आशा वर्कर,स्मशानभूमी (मोक्षधाम) येथे सेवा देत असलेले कर्मचारी, महावितरण,अशा विविध क्षेत्रातील 32 सेवायात्रींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल दोशी, नवल बजाज, तन्मय बूडुख यांनी केले. आभार प्रदर्शन वर्षा चांगभले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन दोशी ,ज्योती रुगले,राजेश खाडे, मनीष रूगले ,गणेश पाटील, नगरपालिका स्टाफ, लायन्स क्लब बार्शी रॉयलचे सभासद यांनी परिश्रम केले.
सोबत गौरव सोहळा मधील सेवायात्री यांची यादी याप्रमाणे
1. सुनील राधेश्याम भराडिया (सामाजिक काम)
2. सागर अरुण कोल्लाळे
(गुरुदेव दत्त बहुउद्देशीय वारकरी, अनाथ आश्रम शाळा)
3. धन्यकुमार पटवा
गो-रक्षा प्राणिमित्र)
4. धनराज मच्छिंद्र भारती
(महावितरण अभियंता)
5. राहुल शिवाजी भड गौडगाव (सहारा वृद्धाश्रम)
6. रूपाली दत्तात्रय पाटील
(कोविड काळात उत्कृष्ट परिचारिका)
7. ज्ञानेश्वर दत्तात्रेय उदार (एपीआय बार्शी)
8. शिवकन्या गोविंद पोळ
(सुपरवायझर हेड ASHA वर्कर्स)
9. प्रकाश गोपीनाथ पाटील (भगवंत देवस्थान सेवा)
10. उद्दीन अल्लाउद्दीन मुजावर (सहाय्यक पोलीस फौजदार)
11. वृक्ष संवर्धन समिती बार्शी(पर्यावरण रक्षण)
12. रवींद्र बजरंग थोरात
(स्मशानभूमी मोक्षधाम सेवक)
व इतर वीस सहाय्यक सेवा यात्री यांचा शाल व सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.