Latest Marathi News

BREAKING NEWS

लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महिला व पुरुष भव्य भजन’ स्पर्धेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती

0

पुणे |

भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित  प्रथमच महिला व पुरुष भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. ३ जानेवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बुधवारी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यास्पर्धेच्या ठिकाणी भेट दिली आणि सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले. यासोबतच त्यांनी लहू बालवडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आपल्या देशात अनंत काळापासून नांदत आलेल्या संस्कृतीतून व्यक्त होणाऱ्या ग्रामीण जीवनातील प्रतिमा, जनमाणसात रुजलेले लोकाचार आणि लोकरुढी याला रंजकतेने नटवित ही लोकसंस्कृती उभी राहते. एकप्रकारे लोकजीवनाचे भावविश्व त्यात प्रतिबिंबित होते. भजन संस्कृती त्यातीलच एक भाग. या संस्कृतीचे आजही ग्रामीण भागात जतन आणि संवर्धनाचे सातत्याने काम होते. या संस्कृतीशी शहरी भागातील अनेकजण बांधिल आहेत. माझ्या कोथरूड मतदारसंघातील भाजपा नेते लहुजी बालवडकर यांनी या संस्कृतीचा लाभ व्हावा, यासाठी महिला पुरुष भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. आज या स्पर्धेस उपस्थिती राहून भजन सेवेचा आस्वाद घेतला. या स्पर्धेत हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झालो.

पाटील यांनी यावेळी बोलताना म्हटले कि, दोन गटाची भजनं मी ऐकली आणि मी चकित झालो अजूनही गावोगाव अजूनही संस्कृती जपून ठेवली आहे. मी पण एका छोट्या गावातला आहे, मी पण नेहमी म्हणत असतो कि, गाव संपली कि संस्कृती संपेल. शहरात कुठे भजनाची प्रॅक्टिस करणार. गावात देऊळ असते त्यामुळे सराव केला जातो. अतिशय वेगळ्या प्रकारची स्पर्धा येथे आयोजित करण्यात आली आहे. मला खूप आनंद झाला म्हणून मी मुद्दाम ज्याच्यातून नेमका भाव ऐकता येतो, नेमकं भजनाची ओळ ऐकू येते ते यंत्र कानाला लावून ऐकत होतो. मला खूप आनंद झाला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी लहू बालवडकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ६ तारखेला १२ वेगवेगळ्या ठिकाणच्या महापुरुषांच्या पादुका दर्शनासाठी या ठिकाणी आणणार आहेत. हजारो संख्येने लोकांचा भंडारा देखील येथे होणार आहे. आपण यात सहभागी व्हाल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.