Latest Marathi News

BREAKING NEWS

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक संपन्न..! चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत घेतले महत्वपूर्ण निर्णय

0

 मातृभाषेतून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार – चंद्रकांत पाटील

मुंबई :

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन येथे संपन्न झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अमलबजावणीसंदर्भात चर्चा झाली. यासाठी सेवानिवृत्त कुलगुरूंच्या समितीद्वारे उपाययोजना सुचवण्यात येतील. तसंच मातृभाषेतून शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाच्या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भातील महत्वाचे मुद्दे : –

१. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांपासून सर्व विद्यापीठांनी NEP ची अंमलबजावणी सुरु करावी असे आदेश. 
२. NEP च्या अमंलबजावणीसाठी सेवानिवृत्त कुलगुरू यांची समिती गठीत करण्यात येऊन त्याद्वारे शैक्षणिक धोरण अमलबजावणीत येणाऱ्या अडचणी यावर उपाययोजना सुचवण्यात येतील. 
३. विद्यार्थ्यांचा प्रवेशादरम्यान घेण्यात येणाऱ्या कागदपत्रात १८ वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी झाल्याची खात्री करून घेण्यात येईल. 
४. NEP च्या अमलबजावणीच्या दृष्टीने मातृभाषेतून शिक्षणावर तसेच बहुभाषिकतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. 
५. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झालेल्या युनिसेफ आणीन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या सामंजस्य करारामध्ये विद्यापीठाने सहभागी व्हावे. 

राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाच्या बैठकीत नवीन शैक्षणिक धोरणा संदर्भातील या महत्वाच्या मुद्द्यांवर आज चर्चा करून काही महत्वपूर्ण आदेश देखील देण्यात आले.

यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, सर्व विद्यापीठांचे कुलगुरू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.