कोल्हापूर |
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोल्हापूर शहर शाखेतर्फे सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार रवी रजपुते यांना प्रदान करण्यात आला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या कोल्हापूर शहर शाखेतर्फे समाजरत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी कोविड काळात औषध फवारणी, कोविड लसीकरण, प्रत्येक घरात जीवनावश्यक वस्तूंचे वितरण , प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या गोळ्यांचे वाटप तसेच महापूर आल्यानंतर पूरग्रस्तांना अन्न धान्य, अंथरून पांघरून निवारा शेडची व्यवस्था करून दिली.
याच कार्याची पोहोच पावती म्हणून हा ‘समाजरत्न’ पुरस्कार माजी उपनगराध्यक्ष रवी साहेब रजपुते यांना सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास वसंतराव मुळीक, महेश जाधव, शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, नगरसेविका रूपाराणी निकम, आदी प्रमुख मान्यवरांसह पार्टीचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक उपस्थित होते.