Latest Marathi News

BREAKING NEWS

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक: प्रवाशांचे होणार हाल!

0

मुंबई |

रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी १४ मे २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा- ठाणे अप आणि डाउन धिम्या मार्गावर, सकाळी ११. ०५ ते दुपारी ४. ०५ वाजेपर्यंत, यामुळे या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वेवर पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर, – सकाळी ११. ०५ ते सायंकाळी ४. ०५ वाजेपर्यंत, ब्लॉक कालावधीत पनवेल/बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
.
पश्चिम रेल्वेवर वसई रोड ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर, शनिवारी रात्री ११. ३० ते रविवारी पहाटे ४. ४५ वाजेपर्यत, या ब्लॉकदरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा भाईंदर ते बोरिवली स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या ब्लॉक दरम्यान रद्द असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.