Latest Marathi News

BREAKING NEWS

युनिकचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

0

बार्शी |

उपळाई(ठों) ता.बार्शी येथील अनुभव बहुउद्धेशिय शैक्षणिक संस्था नारी संचलित युनिक पब्लिक स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन पी एस आय श्री प्रेमनाथ ढगे साहेब,नाबार्ड चे निवृत्त जनरल मॅनेजर श्री आंबरुषी लोकरे साहेब,विजय (बापू) ठोंगे,उपसरपंच संदीप बोटे,हनुमंत(काका) जामदार,अण्णा लुंगसे,उद्योजक नाशिरभाई शेख,दत्तात्रय खामगावकर यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. देवा श्री गणेशा या गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.नन्हा मुन्ना राही हु,झुबी डुबी अश्या गाण्यांवरती चिमुकल्यानी ग्रामस्थांची दाद मिळवून घेतली.

महाराष्ट्राची लावणी वाजले की बारा,चंद्रा,प्रीतीच्या झुल्यात व अहो शेट या लावण्यावरती शाळेतील मुलींनी सर्वांची मने जिंकून घेतली.पाहुणे जेवला काय अन अंगात आलंय या गाण्यांना देखील ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली.या कार्यक्रमासाठी संस्थाध्यक्ष वैभव माळी, सचिव अनुराधा माळी, संजय ढगे,भाग्यश्री ढगे,सुनीता ढगे,गाडेकर,रुपाली येवनकर,अर्चना कांबळे,विकास कांबळे, नवनाथ गाडेकर व पालक यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश दहीहंडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.