‘या’ संघटनेचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा ; उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चंद्रकांत दादा यांच्या हस्ते गौरव
पुणे |
ईपीएफओ संघटनेचा आज ७०वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पुण्यात आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते देऊन गौरव केला. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आजही EPFO हे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी सुरक्षित माध्यम मानले जाते. असे प्रतिपादनही चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

देशाच्या विकासातही ईपीएफओचे मोठे योगदान राहिले आहे. कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे ईपीएफओ खाती समाप्त झाली नाहीत. या कार्यक्रमावेळी श्री सत्यनारायणजी, अरुण कुमारजी, अमित वसिष्ठजी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.