नागपूर |
नागपूर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी वरिष्ठ सभागृहात वादळी झाले. सीमावर बोलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उभे राहिले, असता उपसभापतींनी विरोधी बाकावरील सदस्याला बोलण्याची संधी दिल्याने मंत्री चंद्रकांत पाटील संतप्त झाले. ठरल्याप्रमाणे कामकाज होणार नसेल तर आम्ही सभागृहात येणार नाही तुम्ही तुमच्या मनाने कामकाज चालवा असा इशाराच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपसभापतींना दिला आहे.
विधान परिषदेच्या कामकाजाला सुरुवात होतात कर्नाटक सीमावादाच्या घोषणा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दिल्या. नियमाप्रमाणे जर कामकाज होणार नसेल तर तुमच्या मनाप्रमाणे चालू द्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवेदन देण्यासाठी उठले असता विरोधी बाकावरून राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांना बोलण्याची परवानगी मागितली त्यांना परवानगी देऊ नका अन्यथा आम्ही सुद्धा बोलू शकतो असे सांगितले, सत्ताधारी बाकावरून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला.