मुंबई,दि.२९ |
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई विभागाचे मुख्य अभियंता आर.आर.हांडे यांच्या कार्यालयास संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ राजा माने व सोलापूर जिल्हा सकल मराठा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माऊली पवार यांनी सदिच्छा भेट दिली.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त राजा माने यांनी लिहिलेले “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..” हे पुस्तक आर.आर.हांडे. यांना यावेळी भेट देण्यात आले.महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिलेल्या ७५ दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या गुणवैशिष्ट्यांवर माने यांनी या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.पुस्तकाच्या संकल्पनेबद्दल मुख्य अभियंता हांडे यांनी अभिनंदन केले.माने व पवार यांचे त्यांनी स्वागत केले.