Latest Marathi News

BREAKING NEWS

“माजी नगरसेवक विजय चव्हाण दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

बार्शी नगरपरिषदेतील माजी नगरसेवक विजय मधुकर चव्हाण व त्यांच्या पत्नी अर्चना विजय चव्हाण या दांपत्याच्या हस्ते ६ फेब्रुवारी रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. विजय चव्हाण हे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातील कृषी विद्यालयामध्ये शिक्षक या पदावर कार्यरत आहेत. बार्शी नगरपरिषदेवर २०१६ ते २०२१ या काळात ते नगरसेवक म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम पाहिले आहे, आमदार राऊत गटाकडून कार्यरत आहेत. कृषी महाविद्यालयामध्ये उत्तम शिक्षक म्हणून लौकिक आहे, त्यांचे मूळ गाव पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडी हे असून नोकरीनिमित्त ते बार्शीमध्ये स्थायिक झालेले आहेत. त्याचे वडील मधुकर चव्हाण माजी सैनिक त्यांचा सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग असतो.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण विजय चव्हाण व अर्चना या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.