Latest Marathi News

BREAKING NEWS

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सहसचिवपदी परभणीचे संतोष बोबडे!

0

-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र.

मुंबई |

लोकनेते खा.शरद पवार यांच्या जिव्हाळ्याच्या मानल्या जाणाऱ्या विविध क्रीडा संघटनांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या सहसचिवपदी परभणीचे संतोष बोबडे यांची निवड महाराष्ट्रासाठी भूषणावह मानली जाते.पवार साहेबांचे “राजकीय वारसदार” म्हणून चर्चेत असलेले कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची क्रिकेट संघटन नेतृत्व चळवळीतील इनिंगही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाने सुरु होत असल्याने संतोष बोबडे यांच्या निवडीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

परभणी जिल्ह्यातील राजकारणात माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचे मावसभाऊ असलेले संतोष बोबडे शरद पवार व अजित पवार यांच्यावर निष्ठा वाहत गेली अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत.राज्य सहकारी हाउसिंग फायनान्सचे अध्यक्ष बोबडे यांनी गेल्या चाळीस वर्षापासून मराठवाडा व परभणी जिल्ह्यातील क्रिकेट प्रसारासाठी विशेष कार्य केले. १९८०च्या दशकात सुरुवातीला स्फूर्ती क्रिकेट क्लबच्या आणि नंतर परभणी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून खूप काम केले.त्यांची राज्य सहसचिवपदी झालेली नियुक्ती आता मराठवाड्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देणारी ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.