पुणे |
भारतीय संविधानाबद्दल प्रत्येकाला माहिती हवी, त्यासाठी संविधान हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग असायला हवे, असे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था (बार्टी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज यांच्यातर्फे आयोजित ‘संविधान सन्मान दौड’च्या उद्घाटनावेळी पाटील बोलत होते.
पाटील यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी हिरवा झेंडा दाखवून दौड सुरू झाली. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख व अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) धम्मज्योती गजभये, अविनाश महातेकर, कर्नल विजय कुमार, कर्नल मुखर्जी आदी या वेळी उपस्थित होते.