भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार सभा ; पंकजा मुंडे ही उपस्थित राहणार
पुणे |
कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या नेत्यांची एकत्रित सभा होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता कसब्यात ही सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपच्या नेत्या आणि माजी महिला व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे उपस्थितीत राहणार आहे.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कसब्यात येत आहेत. कसब्यातील पोटनिवडणुकीसंदर्भात आज मुख्यमंत्री कार्यकर्त्यांशी भेटी घेणार आहेत. तसेच लोकांना ते संबोधितही करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सांयकाळी 4 ते 10 पर्यंत बैठका आणि कोपरा सभा घेणार आहेत.
येत्या 26 फेब्रवारी रोजी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर येत्या 02 मार्चला मतमोजणी होणार आहे. या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व पक्षाकडून प्रचाराचा धडाका सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कसबा मतदार संघ मतदार कुणाच्या पारड्यात टाकणार त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.