Latest Marathi News

BREAKING NEWS

‘भाग्यकांता प्रतिष्ठान’ करणार व्यवसाय व उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाचा सन्मान

0

बार्शी |

आठ मार्च जागतिक महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यानिमित्ताने बार्शी शहरांमध्ये भाग्यकांता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने उद्योग व व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर चव्हाण यांनी दिली.

हा सन्मान सोहळा बार्शी शहरातील हॉटेल रामकृष्ण एक्झिक्युटिव्ह येथे ८ मार्च रोजी संध्याकाळी ६.०० वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालिका कल्पनाताई बारबोले यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शोभाताई सोपल सामाजिक संस्थेच्या उज्वलाताई सोपल या असणार आहेत. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आधुनिक बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवयित्री विमलताई माळी ह्या असणार आहेत.

भाग्यकांता प्रतिष्ठान मार्फत महिला दिनानिमित्त दिनात येणाऱ्या २०२२-२३ च्या जीवनगौरव पुरस्काराच्या प्रिया ब्युटी पार्लरच्या कविताताई नेने यांना जाहीर झाला आहे. याशिवाय या कार्यक्रमांमध्ये व्यवसाय व उद्योग क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या बार्शी पंचक्रोशीतील मैथिली ब्युटी पार्लर सुनीता गाडेकर, खंडेश्वर भेळ सुधामती बारंगुळे, फॅशन डिझायनिंग नावलौकिक असणाऱ्या शोभा पल्लोड, विशेषण डेकोर क्षेत्रात काम करणाऱ्या गुंजन व मीना जैन, गंधस्वा ड्रेसवाले सुगंधा आगावणे, चिंतामणी प्लांटरच्या निलिमा रायचुरकर, सुप्रसिद्ध अशा अबॅकस क्लासच्या रश्मी पुणेमिया, डिझायनर केक स्पेशालिस्ट शितल भंडारी, धन्वंतरी ब्युटी पार्लरच्या ज्योती जावळे, लिटल स्कॉलर स्कूलच्या प्रमिला मठपती, होम स्केप अंकिता चांडक, योगा व झूंबा क्लास दिपाली झालटे, नाविन्यपूर्ण अशा सिंक अँड क्लिक क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या कोमल मंगरुळे, श्री गणेश वस्त्र दालनच्या मीनाक्षी यादव, स्टॅम्प व्हेंडर शेहिदा बोहरी, नेहा फॅशन डिझाइनिंगच्या उल्का डोंबे, सुवर्णा मेडिकलच्या स्नेहल पाटील व ब्लॉसम ब्युटी पार्लरच्या नीलम अग्रवाल यांचाही महिला दिनानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

भाग्यवंता सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुरलीधर चव्हाण उपाध्यक्ष राजा माने व संस्थेचे सचिव विजय शिखरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.