Latest Marathi News

BREAKING NEWS

बीडमधील राख गँगला सुतासारखे सरळ करणार : अजित पवार

0


बीड : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार बुधवारी बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या व त्यांच्या अडचणी सोडवल्या. तसेय युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचं सांगितलं.

बीडमध्ये सगळ्या गँग आहेत , राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. इथे या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. बीड ही देवदेवतांची भूमी आहे. जनतेची सेवा करण्यासाठीचे बळ देण्याचे देवदेवतांना साकडे आहे. बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत, असे अजित पवार म्हणाले. तसेच बीडमध्ये मराठा आणि वंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आले आहेत. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं आहे. जाती-जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण यांचं बेरजेचे राजकारण आपल्याला करायचे आहे. कार्यकर्ते घेत असताना रेकॉर्ड बघा. आपल्या बाजूला चुकीच्या प्रवृतीचे लोक नकोत. माझ्या कामाची पद्धत आणि इथच्या कामाच्या पद्धतीत तफावत आहे, असेही अजित पवार म्हणाले. बेरोजगारी ,शिक्षण , व्यवसाय,शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले पाहिजे. पक्षाचा विचार लोकांपर्यंत पोहचवा. सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट करू नका. दादागिरी खपून घेतली जाणार नाही. धागेदोरे लांबपर्यंत पोहचत असतील, त्यावर पण कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवारांनी दिला.

शेतीत एआय तंत्रज्ञान वापरा
शेतीत आता एआय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला पाहिजे. बीडमध्ये तारांगण केले जाणार आहे. विमानतळ जिल्ह्याच्या जवळ असले पाहिजे. टप्प्याटप्याने राज्यातील विमानतळावर नाईट लँडिंग सुरू केले जाणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे सुविधा वाढवण्यात येणार आहेत. पुढे जायचे असेल तर बेरजेचे राजकारण करत करत सर्वसमभाव राजकारण केले पाहजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दारूगोळा सांभाळणारा अल्पसंख्यक होता. समाजात एकोपा राहील, असे काम झाले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.