बार्शी |
भाग्यकांताचा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित चित्रपटाचे आयोजन सुभाषनगर येथील गोल्डन सिनेमॅक्स चित्रपटगृहात करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसापासून टिडिएम चित्रपटाची सिनेरसिकात उत्सुकता लागली होती.
टिडिएम चित्रपटाच्या बार्शीतील पहिल्या शोप्रसंगी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ठोंबरे, सचिव प्रतापराव जगदाळे, नाट्यनिर्माते दीपक नलावडे, क्रडाई अध्यक्ष चेतन जैन, लोकमतचे पत्रकार शहाजी फुरडे पाटील, मल्टीकोरचे संचालक मुरलीधर चव्हाण यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाग्यकांता सामाजिक संस्थेच्या वतीने बार्शी शहरासह जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. भाऊराव कर्हाडे हे या संस्थेचे अजीवन सदस्य आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून नव्वदीच्या दशकातला ग्रामीण व बहुजन समाज भाऊराव कर्हाडे यांनी मांडला आहे, चोखंदळ प्रेक्षकांसाठी टीडीएम चित्रपट हा नवीन पर्वणीचा असणार असून ग्रामीण भाग असलेली भाऊराव यांची कथा व त्या कथेवर त्यांची नैसर्गिक हातोटी, सगळं चित्रपटात अप्रतिम दाखवण्यात आला आहे.
यावेळी भाग्यकांता ग्रुपच्या अध्यक्षा सुनिता गाडेकर, सचिव गणेश शिंदे, सहसचिव श्रद्धा धर्माधिकारी, , मल्टीकोर क्रिएशनचे संचालक अमित इंगोले, संचालक रोहन नलावडे यांच्यासह भाग्यकांता ग्रुपच्या मित्र परिवाराने सहकुटुंब हजेरी लावली.