सोलापूर |
बार्शी येथील उद्योजक आनंद रमेशचंद्र मुंदडा यांचे काल रात्री ११ वाजता निधन झाले. अंत्ययात्रा आज सकाळी साडेदहा वाजता होटगी रोड, किनारा हॉटेल जवळील निवासस्थाना पासून निघणार आहे. आनंद मुंदडा हे उद्योजक असून सुद्धा सामाजिक क्षेत्रात क्रियाशील असे नाव होते. त्यांच्या निधनाने सर्व क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.