Latest Marathi News

BREAKING NEWS

“प्रकाश गायकवाड दाम्पत्याने केले अन्नपूर्णा महाप्रसादाचे पूजन!”

0

बार्शी |

कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी येथे नोकरी करणारे प्रकाश महादेव गायकवाड व त्यांच्या पत्नी जयश्री गायकवाड या दांपत्याच्या हस्ते १६ मार्च रोजी अन्नपूर्णा महाप्रसादाची पूजन करण्यात आले. प्रकाश गायकवाड यांची दोन्ही मुले उच्च विद्याविभूषित असून खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी व्यवसाय करत आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये ही गायकवाड दांपत्याचा सहभाग असतो.

मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना गेली ७ वर्षांपासून दातृत्व जतन करणाऱ्या विविध क्षेत्रातील दानशूरांच्या मदतीने अविरत सुरु आहे. दररोज सुमारे दोनशे निराधार लोकांना दोन वेळेचं अन्न निःशुल्क घरपोच केलं जातंय. शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये देखील नाममात्र दरात भोजन वितरित होतय, अन्नपूर्णा महाप्रसाद पूजन व वितरण महादेव गायकवाड व जयश्री या दाम्पत्यांने केले. मातृभूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून बार्शी तालुक्यामध्ये विविध उपक्रमही राबवले जातात. ग्रामीण भागातील गाळ काढण्यापासून ते थोरा-मोठ्यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजनही केली जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.