Latest Marathi News

BREAKING NEWS

पोलीस भरतीत डोपिंग चाचणी अनिवार्य करण्याची गरज !

0

मुंबई |

✒️जमीर काझी, मुंबई

राज्यातील प्रलंबित पाेलिस भरतीला नव्या वर्षाच्या सुरुवातीला मैदानी चाचणीतून अखेर मुहूर्त मिळाला आहे. विविध घटकातील कॉन्स्टेबल व चालक पदाच्या एकूण १८,३३१ रिक्त जागांसाठी तब्बल १८ लाख १२ हजार ५३८ सुशिक्षित युवक-युवतींनी अर्ज केले असून त्यापैकी जवळपास ८५ टक्के उमेदवार प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. या विक्रमी गर्दीमुळे प्रत्येक पोलीस घटकांमध्ये निवडीसाठी उमेदवारांची शारीरिक व बौद्धिक क्षमता पणाला लागणार आहे. त्यामुळे एकूण दिडशे गुणापैकी ५० गुणाच्या मैदाणी चाचणीत जास्तीजास्त गुण मिळविण्यासाठी काही उमेदवार उत्तेजक द्रव्य घेत असल्याचा प्रकार रायगड , नांदेड जिल्हा पोलीस दलात उघडकीस आला आहे.

झटपट शारीरिक क्षमता वाढण्यासाठी विविध क्रीडा क्षेत्रात मादक पदार्थाच्या सेवनाचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे कुस्ती वगळता अन्य सर्व क्रीडा प्रकाराच्या प्रतिष्ठेच्या स्पधार्मध्ये खेळाडूंची डोपिंग’ चाचणी घेतली जाते. आता अंमली पदार्थ सेवनाचे हे लोण ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ ही बिरूदावली असलेल्या खात्यात शिरण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकाराला प्रतिबंध घालण्यासाठी खात्यात कसल्याच नियमाची तरतूद नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांच्या रक्त तपासणीचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आली तरी त्यांच्यावर पुढील कारवाई कशी करायची ?,असा पेच पोलिस प्रशासनासमोर उभा राहिला आहे.गृह विभागाने किमान पुढील भरतीपासून डोपिंग चाचणीची तरतूद अनिवार्य करण्याची नितांत गरज आहे.

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी गृहखात्याची धुरा सांभाळत असताना खात्यातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. त्याची सुरुवात कॉन्स्टेबल भरतीपासूनच झाली पाहिजे, हे धोरण बाळगून ती पूर्णपणे पारदर्शकपणे करण्याचा विडा उचलला होता. पक्षपातीपणाचा एक टक्काही आक्षेप नसावा, यासाठी त्यांनी मुलाखतीची पद्धतही बंद केली होती. त्यामुळे आजच्या घडीला सरकारी सेवेतील सर्वाधिक पारदर्शक भरतीमध्ये अव्वलस्थान पोलिस भरतीचे आहे.मात्र, उत्तेजक पदार्थाच्या सेवनामुळे त्याला गालबोट लागणार आहे.

मैदानी चाचणीत स्टॅमिना वाढावा, अवघ्या काही मिनिटात अंगात ऊर्जा संचारावी,यासाठी अहमदनगरच्या श्रीगोंदामधील एक तरुण इच्छुक उमेदवाराना फोन करून उत्तेजक व बंदी असलेल्या गोळ्या व सिरप देत असल्याची बाब समजल्यानंतर रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना राबवित त्याला ताब्यात घेऊन केलेल्या झडतीत दोन न्यूरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शनच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद ४४ नीडल्स, कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू४० इन्सुलिनी असा उत्तेजक द्रव्याचा साठा सापडला. त्याने स्टेराॅईड पुरविलेल्या शिरुरच्या दोघा उमेदवारांचा शोध घेतला असून पैकी एकाची मैदानी चाचणी झाली होती. त्यामध्ये त्याने चांगले गुण मिळविलेले आहेत, तर दुसऱ्याला ’ग्राऊंड’ देण्यापासून थोपविण्यात आले. त्यांच्या रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

रायगडमध्ये आतापर्यंत जवळपास साडेनऊ हजारांवर उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली आहे. त्यातील काहींनी या औषधाचा वापर केला असेल का?, त्याचा शोध कसा लावायचा आणि उर्वरित परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी उत्तेजक द्रव्य घेतले आहे की नाही, ते तपासायचे कसे?,असे अनेक प्रश्न घटकप्रमुखांसमोर निर्माण झाले आहेत. पोलीस भरतीत कोणत्याही उमेदवारावर अन्याय हाेवू नये, आणि पारदशर्पपणे प्रक्रिया पार पडावी, यासाठी त्यामध्ये वेळोवेळी आवश्यक बदल करण्यात आले आहेत.
सुमारे दहा वषार्पूवर्प मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया असताना ऊन्हाळ्यात ५ किलोमीटर धावताना अतिताणामुळे थकून ग्रामीण भागातील काही तरुण मरण पावले होते. त्यानंतर ‘मॅरेथॉन’ची पद्धत बंद करुन पुरुषासाठी ती १६०० मीटर इतकी मयार्दित करण्यात आली. मध्यतरी मैदानी चाचणीतील स्पर्धकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिल्यादा लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला.त्यानुसार एक भरतीही पार पडली. मात्र ग्रामीण भागातील तरुणांना त्याचा फटका बसत असल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेने हा मुद्दा लावून धरत पुन्हा पूवर्पप्रमाणे पहिल्यादा मैदानी व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या काळात करुन घेतला. त्यामुळे गरजेनुसार बदल होत राहिले आहेत. त्यामुळे उत्तेजक द्रव्याच्या वाढत्या प्रकाराला आळा घालण्यासाठी भरतीमध्ये ‘डोपिंग’ची चाचणीही अत्यावश्यक करणे गरजेचे राहणार आहे. या किडेला वेळीच ठेचण्यासाठी पोलीस मुख्यालय आणि राज्य सरकारच्या स्तरावरुन त्याबाबत तातडीने भरतीच्या नियमामध्ये आवश्यक तरतूद करणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.