Latest Marathi News

BREAKING NEWS

पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलला ‘अर्जुन’ पुरस्कार; चंद्रकांत दादांनी केले ट्विटरद्वारे अभिनंदन

0

कोल्हापूर |

कोल्हापूरचा प्रतिभाशाली पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटीलने ‘अर्जुन’ पुरस्कारावर मोहोर उमटवली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोल्हापूर कुस्तीसह, नेमबाजी आणि जलतरणामध्ये मोठी परंपरा आहे. स्वप्नीलला पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच कोल्हापूरमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. पॅरालिम्पिकमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारा स्वप्नील कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू आहे. राज्य सरकारनेही त्याचा गौरव केला असून शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे.

https://twitter.com/ChDadaPatil/status/1598177749948329986?t=wixSVP9m6oiIid-6hAIrvQ&s=08

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जलतरणपटू स्वप्नील पाटील यांचे ट्विटर द्वारे अभिनंदन केले आहे, कोल्हापूरचा पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटील याला यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.