Latest Marathi News

BREAKING NEWS

पालघर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, कोट्यवधींची लूट करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

0

पालघर: जिल्ह्यातील वसईमध्ये असणाऱ्या गोल्ड लोन कंपनीवर दरोडा घालण्यात आला होता. अज्ञात दरोडेखोरांनी एक कोटी शहाहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवल्याने चार आरोपींना पकडण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी दिली आहे.

युनायटेड मेट्रो फायनान्स या कंपनीवर दरोडा टाकत 1 कोटी 76 लाखांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी जलद गतीने तपास करत चार आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 49 लाख 71 हजारांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. संबंधीत आरोपी यांनी पूर्वी देखील दरोडे घातल्याच तपासात उघड समोर आलं आहे. 2013 मध्ये ऐक्सिस बँकेतील 3 कोटी 87 लाख रुपयांची रक्कम या टोळक्याने लुटल्याची कबुली दिली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्र_पोलीस #Maharashtrapolice

Leave A Reply

Your email address will not be published.