Latest Marathi News

BREAKING NEWS

“पाणंद रस्ते व विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही..!” – रोजगार हमी योजनामंत्री संदिपान भुमरे

0

औरंगाबाद |

पाणंद रस्ते व विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले. सिल्लोड येथे लाभार्थ्यांना विविध योजनाचे प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, सिंचन विहीर व पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण विषय आहे. सिल्लोड तालुक्यात ५३४ पाणंद रस्ते पूर्ण झाले असून १३६७ शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात आला. वैयक्तिक विहीर व रस्त्यांच्या विकासामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितपणे बदल दिसेल.राज्य शासनाने १ रुपयात पीकविमा, शेतकरी सन्मान योजनेत राज्याचे ६ हजार रुपये मदत या सारखे शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले. असल्याचे पालकमंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले.

यावेळी रोहयोचे मुख्य सचिव नंदकुमार , जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, उपविभागीय अधिकारी कुलदीप जंगम, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन गाढे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी श्री. आहिरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.