मुंबई |
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी १९८९ मध्ये आयआयटी खरगपूर येथून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतलेली आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते मनोहर पर्रीकर हे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी होते. मनोहर पर्रीकर यांनी १९७८ मध्ये आयआयटी बॉम्बेतून मेटलर्जी इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतली आहे .
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश हेदेखील आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी १९७५ मध्ये आयआयटी बॉम्बेमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी मिळवलेली आहे.
राष्ट्रीय लोकदलाचे (आरएलडी) संस्थापक आणि प्रमुख दिवंगत अजित सिंह हेसुद्धा आयआयटीमध्ये शिकले आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूर येथून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हे आयआयटी दिल्लीचे माजी विद्यार्थी आहेत. ते ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांचे पुत्र आहेत. ते सध्या मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत.