Latest Marathi News

BREAKING NEWS

पंढरपूरमध्ये पार्किंगच्या बोगस पावत्या आढळल्यास फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करेल

0

पंढरपूर |

पंढरपूर ही महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असून वर्षातून आषाढी कार्तिकी माघी चैत्री यासारख्या चार मोठ्या यात्रा व दरमहा येणाऱ्या एकादशी दिवशी तसेच चातुर्मासामध्ये संपूर्ण देशामधून व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात,
या येणाऱ्या भाविकांना चांगल्या प्रकारची सेवा सुविधा मिळावी म्हणून नगरपरिषद वेळोवेळी प्रयत्न करत असते.

भाविक शहरांमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांना पार्किंगची व्यवस्था व्हावी म्हणून शहरातील दहा ते अकरा ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यापूर्वी नगर परिषदेच्या वतीने आरोग्य व्यवस्था व पार्किंग साठी कर आकारणी करण्यात येत होती. परंतु येणाऱ्या भाविकांचे विचार करता नगर परिषदेने काही कालावधी करता आरोग्यव्यवस्था व पार्किंगची सुविधा मोफत
पुरविण्याचा निर्णय माघी यात्रेपासून घेतला होता, असे असतानाही यात्रा कालावधीमध्ये व इतर वेळेस शहरातील काही व्यक्ती या मोफत असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी बोगस पावती देऊन पार्किंग कराची रक्कम भाविकांकडून वसूल करत असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. याबाबत शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे नगर परिषदेच्या स्तरावरून तक्रारी नोंदविण्यात आलेल्या आहेत असे असून.

सुद्धा अजूनही काही व्यक्ती पार्किंगच्या बोगस पावत्या देत असल्याचे निदर्शनास येत आहेत तरी नगर परिषदेच्या वतीने सर्व भाविकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही बोगस पावती फाडणाऱ्या व्यक्तीस आरोग्य व्यवस्था पार्किंगची पावती चे पैसे देऊ नये असे बोगस पावती देत असल्याचे निदर्शनास आल्यास, त्वरित नगर परिषदेकडे व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी व अशा बोगस पावती देणाऱ्या व्यक्तीचा फोटो काढून ठेवावा जेणेकरून नगरपरिषद आपण दिलेल्या तक्रारीच्या व माहितीच्या आधारे सदर व्यक्तीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करेल असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.